Home Bibles शास्ते 18:23 · मराठी बायबल
शास्ते 18:23 · मराठी बायबल

मीखाचे लोक दान लोकांच्या नावाने गर्जना करत होते. ते ऐकून दान लोक मागे वळून मीखाला म्हणाले, “काय गडबड आहे? तुम्ही का ओरडताय?”

Cross references

उत्पत्ति 21:17

देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला; आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारुन म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस; तुझ्या मुलाचे रडणे परमेश्वराने ऐकले आहे

1 शमुवेल 11:5

शौल तेव्हा आपली गुरे चरायला घेऊन गेला होता. कुरणातून येतांना त्याने लोकांचा आक्रोश ऐकला. तेव्हा त्याने विचारले, “हे काय चालले आहे? लोकांना शोक करायला काय झाले?”तेव्हा लोकांनी त्याला दूताचे म्हणणे सांगितले.

2 शमुवेल 14:5

राजाने तिची विचारपूस करुन तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, “मी एक विधवा बाई

2 राजे 6:28

मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’

स्तोत्रसंहिता 114:5

लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?

यशया 22:1

दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश.लोकहो, तुमचे काय बिघडले आहे? तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?

Interlinear

Choose Theme