Home Bibles शास्ते 16:7 · मराठी बायबल
शास्ते 16:7 · मराठी बायबल

शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांघले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.”

Cross references

शास्ते 16:10

तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याशी खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?”

1 शमुवेल 19:17

शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदला पळून जायला मदत केलीस.”मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”

1 शमुवेल 21:2

दावीद नोब नामक गावी अहीमलेख या याजकाला भेटायला गेला.अहीमलेख त्याला भेटायला चार पावले पुढे चालून गेला. अहीमलेखला भीतीने कापरे भरले होते. दावीदला त्याने विचारले, “तू एकटाच का? तुझ्याबरोबर कोणीच नाही हे कसे?”

1 शमुवेल 27:10

हे दावीदाने अनेकदा केले. कोणत्या लढाईवरुन ही लूट आणली असे आखीशने दरवेळी विचारल्यावर दावीद प्रत्येक वेळी सांगत असे, “यहूदाच्या दक्षिण भागावर हल्ला केला.” किंवा “यहरमेलीच्या दक्षिण प्रांतात लढाई केली” किंवा “केनीच्या दक्षिण प्रदेशावर चढाई केली”

नीतिसूत्रे 12:19

जर माणूस खोटे बोलला तर त्याचे शब्द लगेचच वाया जातात. पण सत्य मात्र सदैव राहाते.

नीतिसूत्रे 17:7

मूर्खाने खूप बोलणे शहाणपणाचे नसते. तसेच राज्यकर्त्याने खोटे बोलणे शहाणपणाचे नसते.

रोमकरांस 3:8

आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यानां मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.

गलतीकरांस 6:7

तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल.

कलस्सैकरांस 3:9

एकमेकाशी लबाडी करु नका. कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे.

Interlinear

Choose Theme