Home Bibles शास्ते 15:19 · मराठी बायबल
शास्ते 15:19 · मराठी बायबल

तेव्हा देवाने लेहीत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झऱ्याचे नाव त्याने एन-हक्कोरे म्हणजे “धावा करणाऱ्याचा झरा” असे ठेवले. लेही शहरात हा झरा अजूनही आहे.

Cross references

उत्पत्ति 16:13

परमेश्वर हागारेशी बोलला; हागारेने देवासाठी नवे नाव वापरायला सुरवात केली. ती म्हणाली, “ती म्हणाली, “तू ‘मला पाहणारा देव’ आहेस,” कारण “मला समजते की या ठिकाणीही देव मला भेटतो व माझी काळजी करतो.”

उत्पत्ति 28:19

त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले.

उत्पत्ति 30:30

मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हापाशी फार थोडी शेरडेमेंढरे होती; परंतु आता तुम्हापाशी किती तरी कळप आहेत; ज्या ज्या वेळी मी तुमच्यासाठी काही केले त्या प्रत्येक वेळी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. आता मात्र मी स्वत:साठी काही करण्याची व माझ्यासाठी घर बांधण्याची वेळ आली आहे.

उत्पत्ति 45:27

परंतु त्यांनी त्याला योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या; मग योसेफाने त्या सर्वांना मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या चांगल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जीवात जीव आला व त्याला फारच फार आनंद झाला;

निर्गम 17:15

मग मोशेने एक वेदी बांधली व तिला “परमेश्वर माझे निशाण.” असे नांव दिले.

गणना 20:11

मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.

शास्ते 15:9

इकडे पलिष्टी लोक यहूदात गेले आणि लेही या ठिकाणी त्यांनी तळ दिला. तेथून त्यांनी युध्दाची तयारी सुरु केली.

1 शमुवेल 30:12

अंजिराच्या ढेपेचा एक तुकडा आणि द्राक्षाचे दोन घड त्यांनी त्याला दिले. तेव्हा त्याला बरे वाटू लागले. तीन दिवस आणि रात्री त्याच्या पोटात अन्न पाणी गेले नव्हते.

स्तोत्रसंहिता 34:6

या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.

स्तोत्रसंहिता 50:15

देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”

स्तोत्रसंहिता 110:7

राजा वाटेत झऱ्याचे पाणी पितो. तो खरोखरच त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यवानहोईल.

स्तोत्रसंहिता 120:1

मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले.

यशया 40:26

आकाशाकडे पाहा. हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील ‘सेना’ कोणाची निर्मिती आहे. प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान व सामर्थ्यवान आहे. म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.”

यशया 40:29

परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो. तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो.

यशया 41:17

“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

यशया 41:18

वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन. मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन. त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.

यशया 44:3

“मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील.

Interlinear

Choose Theme