तेव्हा चौथ्या दिवशीते सगळे शमशोनच्या बायकोकडे आले. तिला म्हणाले, “आमची फजिती करायला इथे बोलावून घेतले आहे काय? काहीतरी युक्ती लढवून तू आपल्या नवऱ्याकडून या कोड्याचा अर्थ काढून घे. तसे केले नाहीस तर तुला आणि तुझ्या वडीलांच्या घरतील सर्वांना आम्ही घरादारासकट जाळून टाकू.”
Cross references
परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”
एफ्राइमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यासकट तुझ्या घराला आग लावतो.”
“कोणी केले हे सगळे?” पलिष्टी विचारु लागले. कोणी तरी म्हणाले. “तिम्न येथील एकाचा जावई शमशोन हा या सगव्व्याच्या पाठीमागे आहे. कारण त्याच्या सासऱ्याने आपली मुलगी शमशोन ऐवजी त्यांच्या विवाहातील सोबत्याला दिली.” हे ऐकल्यावर पलिष्ट्यांनी शमशोनची बायको आणि तिचे वडील यांना जिवंत जाळले.
पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.”
ते पापी म्हणतील, “आमच्याबरोबर चल. आपण लपू आणि कोणाला तरी मारण्याची वाट बघू.
दुसन्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील.
वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल.
तुमच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मित्रावरही विश्वासून राहू नका. तुमच्या पत्नीशीसुध्दा मनमोकळे बोलू नका.