इफ्ताहने अम्मोनी लोकांच्या राजाकडे दूतान करवी संदेश पाठवला तो असा; “अम्मोनी लोक आणि इस्राएल लोक यांच्यामध्ये कोणताही तंटा बखेडा नसताना तू आमच्यावर चढाई का करतोस?”
Cross references
मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता: “तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात: आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
इस्राएल लोकांनी काही माणसे आमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,
“मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दंतूकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,
“तुम्ही एखाद्या नगरावर चाल करुन जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करुन पाहा.
इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोक आपल्याला वरचेवर त्रास देत होते. म्हणून मी माझ्या सैन्यासह त्यांच्यावर चालून गेलो. तेव्हा मी तुम्हाला बोलावले होते पण तुम्ही कुमक पाठवली नाही.
इस्राएलचा राजा येहू याचा मुलगा यहोआहाज त्याचा मुलगा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. संदेशात म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”
तुम्ही काही बघितले असेल तर त्याबद्दल न्यायाधीशाला सांगण्याची घाई करु नका. तुम्ही चुकत आहात हे दुसऱ्याने सिध्द केले तर तुम्ही गोंधळून जाल.
“जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्यांने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस.