Home Bibles यहोशवा 3:6 · मराठी बायबल
यहोशवा 3:6 · मराठी बायबल

मग याजकांना यहोशवाने कराराचा कोश घेऊन सर्वांच्या आधी जायला सांगितले. तेव्हा याजकांनी कोश उचलला व ते सर्वांपुढे चालत निघाले.

Cross references

गणना 10:33

मग होबाब मान्य झाला. आणि परमेश्वराच्या पर्वतापासून ते प्रवास करीत निघाले. याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश घेतला व ते लोकांच्यापुढे चालले. मुक्कामासाठी जागा शोधताना तीन दिवस तो पवित्र कोश त्यांनी वाहिला.

गणना 14:15

म्हणून आता तू या लोकांना मारू नकोस. जर तू त्यांना मारलेस तर सर्व देशांना ही बातमी कळेल व ते म्हणतील.

यहोशवा 3:3

त्यांनी लोकांना आज्ञा दिल्या. ते म्हणाले, “लेवी याजक तुमच्या परमेश्वर देवाच्या कराराचा कोश वाहून नेताना तुम्हाला दिसतील तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जा.

यहोशवा 6:6

तेव्हा नूनाचा पुत्र यहोशवाने सर्व याजकांना बोलावले त्यांना तो म्हणाला. “परमेश्वराचा पवित्र करारकोश घेऊन चला. तसेच सात याजकांना रणशिंगे घेऊन करार कोशापुढे चालायाला सांगा.”

मीखा 2:13

फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील. त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल. परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.

योहान 14:2

माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.

इब्री लोकांस 6:20

जेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे अनंतकाळासाठी मुख्य याजक झाला आहे.

Interlinear

Choose Theme