Home Bibles यहोशवा 3:1 · मराठी बायबल
यहोशवा 3:1 · मराठी बायबल

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून यहोशवा सर्व इस्राएल लोकांसह अकाशियाहून (अथवा शिट्टिमाहून) निघून यार्देन नदीपर्येत आला. नदी पार करण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला.

Cross references

उत्पत्ति 21:14

दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.

उत्पत्ति 22:3

तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला व दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले.

गणना 25:1

इस्राएल लोक शिद्दीमात रहात असताना त्यांनी मवाबच्या बायकांबरोबर लैंगिक पाप करायला सुरुवात केली.

यहोशवा 2:1

नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषत: यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले.त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.

यहोशवा 6:12

यहोशवा पहाटे उठला. याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला.

यहोशवा 6:15

सातव्या दिवशी ते पहाटे उठले. त्यांनी नगराला सात वेळा फेऱ्या घातल्या. त्यांनी सर्व पूर्वी प्रमाणेच केले, फक्त फेऱ्या तेवढ्या सात घातल्या.

यहोशवा 7:16

दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व इस्राएल लोकांना परमेश्वरासमोर आणले. सर्व वंशांचे लोक परमेश्वरापुढे उभे राहिले. परमेश्वराने यहूदाच्या वंशाची निवड केली.

यहोशवा 8:10

दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व लोकांना एकत्र आणले यहोशवा व इस्राएलाच्या पुढाऱ्यांनी या लोकांसह आय कडे मोर्चा वळवला.

शास्ते 20:19

हे इस्राएल लोक बेथेल येथे गेले बन्यामीनांवर आपल्यापैकी कोणी आधी हल्ला करावा याबाबत त्यांनी परमेश्वराचा कौल घेतला.

1 शमुवेल 17:20

दुसऱ्या दिवशी दावीदाने आपली मेंढरे दुसऱ्या एका मेंढपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तळाशी पोचला तेव्हा सर्व सैनिक रणगर्जना करत आपापल्या युध्दव्यूहातल्या जागांवर चालले होते.

स्तोत्रसंहिता 119:60

अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.

यिर्मया 7:13

इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” हा परमेश्वराचा संदेश आहे.! ‘मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हाला बोलाविले, पण तुम्ही ओ दिली नाही.

यिर्मया 25:3

गेली 23वर्षे मी परमेश्वराचे संदेश पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या13व्या वर्षापासून मी संदेष्टा आहे. मी तेव्हापासून आजपावेतो तुम्हाला परमेश्वराकडून आलेले संदेश ऐकविले आहेत. पण तुम्ही ऐकले नाही.

यिर्मया 26:5

माझ्या सेवकांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत. (संदेष्टे माझे सेवक आहेत) मी पुन्हा पुन्हा माझे सेवक पाठविले. पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही.

मीखा 6:5

माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याचे दुष्ट कट आठवा. बौराचा मुलगा बलाम, बालाकला काय म्हणाला त्याची आठवण करा. शिट्टीमपासून गिल्गापर्यतकाय घडले त्याचे स्मरण करा. ह्या गोष्टींचे स्मरण केल्यावर तुमच्या लक्षात येऊल की परमेश्वर बरोबर होता.”

मार्क 1:35

अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली.

Interlinear

Choose Theme