Home Bibles यहोशवा 21:2 · मराठी बायबल
यहोशवा 21:2 · मराठी बायबल

ही भेट कनान देशातील शिलो येथे झाली. लेवी प्रमुख त्यांना म्हणाले, “आम्हाला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या गुराढोरांना चरण्यासाठी कुरणे द्यावीत अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली आहे.”

Cross references

गणना 35:2

“इस्राएल लोकांना सांग की त्यांनी त्यांच्या भागातील काही शहरे लेवी लोकांना दिली पाहिजेत. इस्राएल लोकांनी काही शहरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांना दिली पाहिजेत.

यहोशवा 14:5

परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा दिली तसेच याबाबतीत इस्राएल लोकांनी केले.

यहोशवा 18:1

सर्व इस्राएल लोक शिला येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते.

यहेज्केल 48:9

तुम्ही जमीन परमेश्वराला अर्पण करावी. ती लांबीला 25,000 हात (8.3मैल) व रुंदीला 20,000 हात (6.6मैल) असेल.

मत्तय 10:10

सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे.

गलतीकरांस 6:6

ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.

1 तीमथ्याला 5:17

जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे, विशेषत: जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना.

Interlinear

Choose Theme