चिठ्ठ्या टाकल्या त्यात पहिली चिठ्ठी कहाथी कुळातील लेवींची निघाल्यामूळे ही नगरे त्यांची.
Cross references
कहाथाचे मुलगे अम्राम. इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षाचे होते.
अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्यासी लग्न केले तिच्या पोटी त्याला अहरोन व मोशे ही दोन मुले झाली. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला.
अहरोनाला चार मुलगे होते. नादाब हा थोरला मुलगा, त्यानंतरचे अबीहू, एलाजार व इथामार.
कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.
कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
“लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या लोकांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)
कहाथी हे लेवी वंशातील एक कूळ, त्याच्यातील अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा शिमोन आणि बन्यामीन यांच्या वाटणीच्या प्रदेशातील तेरा नगरे मिळाली.