Home Bibles यहोशवा 13:7 · मराठी बायबल
यहोशवा 13:7 · मराठी बायबल

आता, नऊ वंश आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्यात या देशाचे भाग कर.”

Cross references

गणना 26:53

“जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल.

गणना 32:2

म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.

गणना 33:54

तुमच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग मिळेल. तुम्ही चिठ्ठया टाकून कोणाला कुठली जमीन मिळते ते ठरवाल. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. चिठ्यां कुठल्या कुळाला कुठली जमीन मिळाली ते कळेल. प्रत्येक कुळाला त्याचा स्वत:चा जमिनीचा तुकडा मिळेल.

गणना 34:13

तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना या आज्ञा दिल्या, “तुम्हाला हा प्रदेश मिळेल. तुम्ही नऊ कुळात आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळात जमिनीची विभागणी करण्यासाठी चिठ्ठ्या टाकाल.

यहोशवा 14:2

परमेश्वराने मोशेला याविषयी पूर्वीच आज्ञा दिली होती. तिला अनुसरुनच साडेनऊ वंशांच्या लोकांनी चिठ्ठ्या टाकून वाटे केले.

यहेज्केल 47:13

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “इस्राएलच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी पुढीलप्रमाणे होईल. योसेफाला दोन भाग मिळतील.

यहेज्केल 48:23

“ह्या विशेष जमिनीच्या दक्षिणेकडची जमीन यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या वंशांना मिळेल. पूर्व-सीमेपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेल्या ह्या जमिनीचा हिस्सा ज्या वंशांना मिळेल, ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे असे: बन्यामीन, शिमोन, इस्साखार, जबुलून, गाद.

Interlinear

Choose Theme