Home Bibles यहोशवा 13:21 · मराठी बायबल
यहोशवा 13:21 · मराठी बायबल

म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख व पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा व मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.

Cross references

गणना 21:24

पण इस्राएल लोकांनी राजाला मारले. नंतर त्यांनी अर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण आम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते.

गणना 25:15

आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबीहोते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.

गणना 31:8

त्यांनी जे लोक मारले त्यांत अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामलांही तलवारीने मारले.

अनुवाद 2:30

“पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्याला पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला अडेलतट्ठु केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.

अनुवाद 3:10

माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलका व एद्रई सकट सर्व प्रांत आपण काबीज केला.”

Interlinear

Choose Theme