Home Bibles यहोशवा 11:12 · मराठी बायबल
यहोशवा 11:12 · मराठी बायबल

यहोशवाने ही सर्व नगरे घेतली तेथील सर्व राजांना ठार केले. या नगरांमधील सर्वच्या सर्व गोष्टींचा विध्वंस केला. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे त्याने हे केले.

Cross references

गणना 33:50

त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

अनुवाद 7:2

तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.

अनुवाद 9:3

पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे.

अनुवाद 20:16

“पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.

यहोशवा 8:8

“परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागा. माझ्याकडे लक्ष असू द्या नगरावर हल्ला करण्याची मी आज्ञा देईन. तेव्हा नगर काबीज करून त्याला आग लावा.”

यहोशवा 8:31

परमेश्वराचा सेवक मोशे याने वेद्या कशा बांधाव्यात हे इस्राएल लोकांना सांगितले होते. तेव्हा, मोशेच्या नियमशास्त्रात लिहून ठेवल्या बरहुकूम यहोशवाने ती बांधली. त्यासाठी कोणत्याही हत्याराचा स्पर्श न झालेले अखंड पाषाण वापरले. अशा वेदीवर त्यांनी होमार्पणे तसेच शांत्यार्पणे वाहिली.

यहोशवा 9:24

यावर गिबोनचे लोक म्हणाले, “तुम्ही आम्हाला ठार कराल या भीतीने आम्ही खोटे बोललो. आम्ही असे ऐकले की हा देश तुम्हाला द्यायची परमेश्वराने मोशे या आपल्या सेवकाला आज्ञा केली आहे, तसेच येथे राहाणाऱ्या सर्वांना ठार करायला ही देवाने तुम्हाला सांगितले आहे. म्हणून आम्ही खोटे बोललो.

यहोशवा 10:20

यहोशवा व इस्राएल लोक यांनी शत्रूला ठार केले पण त्यातील काही कसेबसे सुटून नगरात जाऊन लपले. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.

यहोशवा 10:28

त्या दिवशी यहोशवाने मक्केदाचा पराभव केला. तेथील राजा आणि नगरातील लोक यांना यहोशवाने ठार केले. कोणीही वाचला नाही. यरीहोच्या राजाची केली तीच गत यहोशवाने मक्के दाच्या राजाचीही केली.

यहोशवा 10:30

परमेश्वराच्या कृपेने, हे नगर आणि त्याचा राजा यांचा इस्राएल लोकांनी पराभव केला. तेथील सर्वजण प्राणाला मुकले. कोणीही त्यातून जिवंत राहिला नाही. आणि यरीहोच्या राजाचे केले तसेच इस्राएल लोकांनी या राजाचेही केले.

यहोशवा 10:32

परमेश्वराने त्यांच्या हातून लाखीशचाही पाडाव केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या शहराचा पराभव करुन सर्व लोकांना ठार केले. लिब्नाचीच पुनरावृत्ती येथे झाली.

यहोशवा 10:35

त्याच दिवशी त्यांनी ते शहर काबीज करून सर्व लोकांना ठार केले. लाखीशमध्ये जसे झाले तसेच येथेही झाले.

यहोशवा 10:37

हेब्रोन शहर आणि त्याच्या भोवतालची छोटी गावे त्यांनी काबीज केली. नगरातील सर्वांचा इस्राएल लोकांनी संहार केला. एकूण एक लोक प्राणाला मुकले. एग्लोन प्रमाणेच येथेही त्यांनी शहर उध्वस्त केले व लोकांना ठार केले.

यहोशवा 10:39

3त्यांनी ते नगर व त्याच्या आसपासची गावे घेतली तसेच राजाचा पराभव केला. नगरातील एकूण एक जणांना ठार केले. हेब्रोन आणि लिब्ना ही नगरे व तेथील राजे यांची जी गत केली तशीच दबीर व त्याच्या राजाचीही केली.

यहोशवा 11:15

परमेश्वराने आपला सेवक मोशे याला फार पूर्वीच ही आज्ञा दिली होती. नंतर मोशेने हे यहोशवाला सांगितले होते. यहोशवाने परमेश्वराचे ऐकले. परमेश्वराने मोशेला सांगितले ते ते सर्व यहोशवाने न चुकता केले.

यहोशवा 13:6

“लबानोनापासून मिस्रपोथ-माईमपर्यंत पसरलेल्या डोंगराळ भागात सीदोनी राहतात. पण इस्राएल लोकांसाठी मी या सर्वांना तेथून हुसकावून लावीन. इस्राएल लोकांमध्ये तू जमिनीची वाटणी करशील तेव्हा या भागाचेही लक्षात असू दे मी सांगितल्याप्रमाणे वाटे कर.

यहोशवा 21:44

तसेच परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना शब्द दिल्याप्रमाणे, सगळीकडे सर्वत्र शांतता नांदू लागली. यांना कोणताही शत्रू नामोहरण करु शकला नाही. उलट परमेश्वराच्या करणीने शत्रूच इस्राएल लोकांच्या हाती आला.

Interlinear

Choose Theme