Home Bibles यहोशवा 10:31 · मराठी बायबल
यहोशवा 10:31 · मराठी बायबल

मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक लिब्ना येथून निघून लाखीशला आले. त्या नगराभोवती वेढा देऊन मग त्यांनी चढाई केली.

Cross references

यहोशवा 10:3

त्याने हेब्रोनचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,

यहोशवा 10:5

तेव्हा यरूशलेमचा राजा, हेब्रोनचा राजा, यर्मूथचा राजा, लाखीशचा राजा तसेच एग्लोनचा राजा या अमोऱ्यांच्या पाच राजांनी आघाडी केली आणि आपले सैन्य घेऊन ते गिबोनवर चढाई करून गेले. सैन्याने त्या शहराला वेढा दिला आणि लढाईला सुरुवात केली.

यहोशवा 12:11

यर्मूथाचा राजा1लाखीशाचा राजा1

यहोशवा 15:39

लाखीश, बसकाथ, एग्लोन,

2 राजे 14:19

अमस्याविरुध्द यरुशलेममध्ये लोकांनी कट केला. तेव्हा अमस्या लाखीश येथे पळाला. पण लोकांनी माणसे पाठवून त्याचा लाखीशर्पंत पाठलाग केला आणि त्यांनी अमस्याचा तेथे वध केला. अमस्याचा मृत्यू

2 राजे 19:8

अश्शूराचा राजा लाखीश सोडून गेल्याचे सेनापतीने ऐकले. यहूदातील एक नगर लिब्ना याच्याविरुध्द तो लढत असल्याचे त्या सेनापतीला आढळले.

2 इतिहास 11:9

अदोरइम, लाखीश, अजेका,

यशया 37:8

अश्शूरच्या राजाला एक वृत्तांत कळला तो वृत्तांत असा होता: “कूशचा राजा तिऱ्हाका तुमच्यावर स्वारी करण्यास येत आहे.” म्हणून अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले व तो लिब्नाला गेला. सेनापतीने हे ऐकले व तो राजा लढत होता तेथे म्हणजे लिब्नाला गेला नंतर सेनापतीने हिज्कीयाकडे दूत पाठविले. सेनापती म्हणाला,

मीखा 1:13

लाखीशच्या महिले, गाडी चपळ घोडा जुंप. सियोनच्या पापाला लाखीशमध्ये सुरवात झाली. का? कारण तू इस्राएलच्या पापांत सामील झालीस.

Interlinear

Choose Theme