तो म्हणाला, “गुहेचे तोंड प्रचंड दगड लावून बंद करा. तिथे माणसांचा पाहारा बसवा
Cross references
यहोशवा म्हणाला, “आता ते गुहेच्या तोंडावरचे दगड हलवून त्या राजांना माझ्याकडे आणा.”
शखेमच्या गढीमध्ये काही माणसे अजूनही होती. त्यांनी हे ऐकले तेव्हा एल-बरीथ परमेश्वराच्या मंदिराच्या सर्वात सुरक्षित खोलीमध्ये ती एकत्र जमली.
संकटे कोसळतात तेव्हा दुष्ट माणसे त्यातून वाचतात. देवाच्या क्रोधातून ते सहीसलामत सुटतात.
सिंहापासून दूर पळणाऱ्या माणसावर अस्वलाने हल्ला करावा, अशी तुमची स्थिती होईल. घरात जाऊन भिंतीवर हात ठेवणाव्याला साप चावावा, तशी तुमची अवस्था होईल.
मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.
म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.