Home Bibles योना 2:9 · मराठी बायबल
योना 2:9 · मराठी बायबल

फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते “हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”

Cross references

उत्पत्ति 35:3

आपण येथून निघून बेथेलास जाऊ; मी त्रासात व संकटात असताना ज्याने मला मदत केली त्या देवासाठी मी तेथे तेथे माझ्याबरोबर असत आला आहे.”

अनुवाद 23:18

पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षात घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.

1 शमुवेल 12:21

मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू. निळळ पुतळे. तेव्हा त्यांची पूजा करु नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत त्या व्यर्थ होत.

2 शमुवेल 15:7

पुढे चार वर्षानीअबशालोम राजा दावीदाला म्हणाला, “हेब्रोनमध्ये मी परमेश्वराला नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ दे.

ईयोब 22:27

तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील.

स्तोत्रसंहिता 3:8

परमेश्वरा, जय तुझाच आहे. परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.

स्तोत्रसंहिता 37:39

परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.

स्तोत्रसंहिता 50:14

म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.

स्तोत्रसंहिता 50:23

म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”

स्तोत्रसंहिता 66:13

म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन. मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.

स्तोत्रसंहिता 68:20

तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.

स्तोत्रसंहिता 107:22

परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा. परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.

स्तोत्रसंहिता 116:17

मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.

उपदेशक 5:4

जर तुम्ही देवाला वचन दिले असेल तर ते पाळा. ती वचने पाळायला वेळ लावू नका. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जे देण्याचे वचन तुम्ही देवाला दिले होते ते त्याला द्या.

यशया 45:17

पण परमेश्वर इस्राएलला वाचवील आणि हे तारण निरंतर सुरूच राहील. परत कधीही इस्राएलला लज्जित व्हावे लागणार नाही.

यिर्मया 33:11

तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.

होशेय 14:2

तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर व परमेश्वराकडे परत ये. “त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर. आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.

योहान 4:22

जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते.

प्रेषितांचीं कृत्यें 4:12

येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारु शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे, आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे!”

रोमकरांस 12:1

म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.

इब्री लोकांस 13:15

तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या. म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊ या

प्रकटीकरण 7:10

ते मोठ्याने ओरडत होते, “तारणआमच्या देवाचे आहे. व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो.”

Interlinear

Choose Theme