Home Bibles योहान 8:6 · मराठी बायबल
योहान 8:6 · मराठी बायबल

येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.

Cross references

उत्पत्ति 49:9

यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस; माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस;यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहेआणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही.

गणना 14:22

मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली.

स्तोत्रसंहिता 38:12

माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.

स्तोत्रसंहिता 38:14

लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे. मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.

स्तोत्रसंहिता 39:1

मी म्हणालो “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”

नीतिसूत्रे 26:17

दोन माणसांच्या वादातला भाग बनणे हे फार धोकादायक असते. ते रसत्याने चालताना कुत्र्याला त्याचे कान धरुन पकडण्यासारखेच असते.

उपदेशक 3:7

वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. गप्प बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.

यिर्मया 17:13

परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो परमेश्वराला अनुसरणे सोडेल, त्याला लाजवले जाईल आणि त्याचे आयुष्य अल्प असेल.

दानीएल 5:5

मग अचानक एक मानवी हात भिंतीवर लिहिताना दिसू लागला. भिंतीच्या गिलाव्यावर बोंटांनी शब्द कोरले गेले, राजवाड्याच्या दिवठाणा जवळच्या भिंतीवर हाताने लिहीले जात असताना राजाने पाहिले.

आमोस 5:10

संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात. संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.

आमोस 5:13

त्या वेळी, सुज्ञ शिक्षक गप्प बसतील. का? कारण ती वाईट वेळ आहे.

मत्तय 10:16

“लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा.

मत्तय 15:23

पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”

मत्तय 16:1

परूशी आणि सदूकी येशूकडे आले, त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हांला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.

मत्तय 19:3

काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी काय?

मत्तय 22:18

येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला. ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहेत?

मत्तय 22:35

एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.

मत्तय 26:63

पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”

मार्क 8:11

मग परूशी आले व त्याला प्रश्न विचारू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले.

मार्क 10:2

काही परुशी येशूकडे आले. त्यांनी त्याला विचारले, “आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले.

मार्क 12:15

परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे (चांदीचे एक नाणे) आणा म्हणजे मी ते पाहीन.”

लूक 10:25

नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रथम केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

लूक 11:16

काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले.

लूक 11:53

येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले.

लूक 20:20

तेव्हा त्यानी त्याच्यावर पाळत ठेवली. आणि आपण प्रामाणिक आहोत असे भासविणारे हेर पाठविले. त्यांची अशी योजना होती की, त्याच्या बोलण्यात त्याला पकडावे म्हणजे त्यांना त्याला राज्यपालाच्या ताब्यात देऊन त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत आणता आले असते. अधिकारामध्ये सुपूर्त करता आले असते.

योहान 8:2

दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.

1 करिंथकरांस 10:9

आणि त्यांच्यातील काही जणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, सापांकडून ते मारले गेले.

Interlinear

Choose Theme