Home Bibles योहान 7:44 · मराठी बायबल
योहान 7:44 · मराठी बायबल

काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही.

Cross references

योहान 7:30

येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती.

योहान 8:20

येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली (पकडले) नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.

योहान 18:5

“नासरेथचा येशू.” ते म्हणाले. येशूने उत्तर दिल, “तो मी आहे” (आणि विश्वासघात करणारा यहूदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता)

प्रेषितांचीं कृत्यें 18:10

मी तुझ्याबरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:11

त्या रात्री प्रभु पौलाजवळ उभा राहिला. आणि म्हणाला, “धीर धर! कारण जशी तू माइयाविषयी यरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माइयाविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.”

प्रेषितांचीं कृत्यें 27:23

मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ति मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.

Interlinear

Choose Theme