Home Bibles योहान 6:33 · मराठी बायबल
योहान 6:33 · मराठी बायबल

देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो, तोच ती भाकर.”

Cross references

योहान 3:13

मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”

योहान 6:38

मी स्वर्गातून खाली आलो, ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही.

योहान 6:48

मी जीवन देणारी भाकर आहे.

योहान 6:50

जी स्वर्गातून उतरते ती भाकर मी आहे. जर ही भाकर कोणी खाईल तर तो कधीच मरणार नाही.

योहान 8:42

येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वत:च्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठिले.

योहान 13:3

आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून,

योहान 16:28

मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो आणि आता मी जग सोडत आहे, आणि पित्याकडे पुन्हा जात आहे.”

योहान 17:8

कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली. आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की, मी तुझ्यापासून आलो आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस.

1 तीमथ्याला 1:15

एक विश्वासनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे.

1 योहान 1:1

जगाच्या सुरुवातीपासून हे होत. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखूनपाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत.

Interlinear

Choose Theme