Home Bibles योहान 5:27 · मराठी बायबल
योहान 5:27 · मराठी बायबल

आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे. कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे.

Cross references

स्तोत्रसंहिता 110:1

परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन. माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”

स्तोत्रसंहिता 110:6

देव सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. सर्व जमीन प्रेतांनी झाकली जाईल आणि बलवान राष्ट्रांच्या नेत्यांना देव शिक्षा करील.

दानीएल 7:13

माझ्या रात्रीच्या दृष्टान्तात मला मनुष्यप्राण्याच्या आकृतीसारखे काहीतरी दिसले. तो ढगांवरून येत होता. तो प्राचीन राजाकडे आला. त्याला राजासमोर आणण्यात आले.

योहान 5:22

याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 10:42

येशूने आम्हांला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हांला आज्ञा केली.

प्रेषितांचीं कृत्यें 17:31

देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”

1 करिंथकरांस 15:25

कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे.

इफिसकरांस 1:20

जो तो ख्रिस्तामध्ये करतो. जेव्हा त्याला (ख्रिस्ताला) मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.

फिलिप्पैकरांस 2:7

उलट त्याने सर्व काही सोडून दोल, आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.

इब्री लोकांस 2:7

थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस

1 पेत्र 3:22

तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजव्या हाताशी बसला आहे. देवदूत, अधिकार आणि सामर्थ्य हे सर्व त्याच्या अधीन आहेत.

Interlinear

Choose Theme