Home Bibles योहान 21:23 · मराठी बायबल
योहान 21:23 · मराठी बायबल

या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”

Cross references

अनुवाद 29:29

“काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.

ईयोब 28:28

आणि देव लोकांना म्हणाला, “परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे. वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”

ईयोब 33:13

ईयोब, तू देवाशी वाद घालत आहेस. देवाने तुला सर्व काही नीट सांगावे असे तुला वाटते.

दानीएल 4:35

पृथ्वीवरचा मनुष्यप्राणी खरच महत्वाचा नाही. स्वर्गीय सामर्थ्यांत व पृथ्वीवरच्या माणसांत देवाच्याच इच्छेने सर्व काही घडते त्याच्या सामर्थ्यशाली हाताला कोणी अडवू शकत नाही. त्याच्या कृत्यांबद्दल कोणी त्याला प्रश्न विचारू शकत नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 1:15

काही दिवसांनी विश्वासणान्यांची एक सभा झाली. (तेथे सुमारे 120 जण होते.) तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला,

Interlinear

Choose Theme