Home Bibles योहान 21:2 · मराठी बायबल
योहान 21:2 · मराठी बायबल

काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र,थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते.

Cross references

यहोशवा 19:28

पुढे एब्रोन, रहोब, हम्मोन व काना येथपर्यंत जाऊन मोठ्या सीदोन पर्यंत गेली.

मत्तय 4:21

तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले.

लूक 5:10

जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे ही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते. ते शिमोनाचे भागीदार होते. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको. कारण येथून पुढे तू माणसे धरशील.”

योहान 1:45

फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”

योहान 2:11

स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालीलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला. आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

योहान 4:46

येशू पुन्हा गालीलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षारसात रुपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य आधिकारी होते त्यापैकी एक आधिकारी कफर्णहूम नगरात राहत होता, या माणसाचा मुलगा आजारी होता.

योहान 11:16

तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”

योहान 20:28

थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”

Interlinear

Choose Theme