Home Bibles योहान 2:16 · मराठी बायबल
योहान 2:16 · मराठी बायबल

येशू कबुतरे विकणान्यांना म्हणाल, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”

Cross references

यिर्मया 7:11

हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.”‘ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

होशेय 12:7

“याकोब, हा खरा व्यापारी आहे. तो त्याच्या मित्रांनासुध्दा फकवितो त्याचे तराजू सुध्दा खोटे आहेत.

मत्तय 21:13

येशू त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, ‘माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. पण तुम्ही त्याला लुटारुंची गुहा केले आहे.”‘

मार्क 11:17

मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्टांचे प्रार्थनामंदिर म्हणातील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्याला चोरांची गुहा बनविली आहे.”

लूक 2:49

मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे, तेथे मी असावे हे तुम्हांला माहीत नव्हते काय?”

योहान 5:17

परंतु येशू यहूदी लाकांना म्हणाला, “माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करेतो”.

योहान 8:49

येशूने उत्तर दिले. “मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो. परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही.

योहान 10:29

माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही.

योहान 20:17

येशू तिला म्हणाला, “माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही, तर माझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग: मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे व माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे जात आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:24

देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे. जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.

1 तीमथ्याला 6:5

आणि ज्यांची मने डागाळलेली आणि सत्यापासून हिरावलेली आहेत अशा माणसांची सततची भांडणे होतात, त्यांना असे वाटते की, देवाची सेवा करणे हे श्रीमंत होण्याचे माध्यम आहे.

2 पेत्र 2:3

त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्याशिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही तर त्यांचानाश त्यांची वाट पाहत आहे.

2 पेत्र 2:14

त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडेकामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापातओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.

Interlinear

Choose Theme