जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते.
Cross references
नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,“तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
आणि सारा म्हणाली, “परमेश्वर देवाने मला हास्य म्हणजे आनंदीआनंद दिला आहे. ज्या कोणाला हे समजेल त्या प्रत्येकाला माइयाबरोबर आनंद होईल.
म्हणून राहेल गर्भवती झाली व तिला मुलगा झाला;
ती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती.
नंतर तू तुझे दु:ख विसरशील. तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.
प्रत्येक माणूस भेदरलेला असेल. बाळंत होत असलेल्या स्त्रीप्रमाणे भितीने त्यांच्या पोटात गोळा उठेल. त्यांची तोंडे अग्रीप्रमाणे लाल होतील. सर्वांच्याच तोंडावर ही कळा पाहून ते आश्चर्यचकीत होतील.
परमेश्वरा, संकटात असताना लोक तुझे स्मरण करतात. तू शिक्षा केल्यास लोक मनात तुझा धावा करतात.
“पुढील प्रश्न विचारा व त्यांचा विचार करा. पुरुषाला मूल होऊ शकेल का? अर्थात् नाही मग प्रत्येक पुरुष प्रसूतिवेदना होणाऱ्या बाई प्रमाणे पोट धरताना का दिसत आहे? प्रत्येकाचा चेहरा मृताप्रमाणे पांढराफटक का पडला आहे? का? कारण ते फार घाबरले आहेत.
त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल. तो सुज्ञ मुलगा नसेल त्याची जन्मवेळ येईल, तेव्हा तो वाचणार नाही.
सियोनच्या कन्ये, तुला वेदना जाणवू दे. तू आपल्या बाळाला जन्म दे.” तुला या नगरीतून (यरुशलेममधून) बाहेर गेलेच पाहिजे. तू रानात राहशील. मला असे म्हणायचे आहे की तू बाबेलला जाशील. पण त्या ठिकाणापासून तुझे रक्षण केले जाईल. परमेश्वर तेथे जाऊन तुझी सुटका करील. तो, तुला, तुझ्या शत्रूंपासून दूर नेईल.
अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला.
कारण असे लिहिले आहे.जिने जन्म दिला नाही, त्या मूल नसलेल्या (स्त्रीने) आनंद करावा! ज्या तुला प्रसूतिवेदना झालेल्या नाहीत ती तू आनंदानेघोष कर, आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत”यशया 54:1
जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!
ती स्त्री गरोदर होती. ती (बाळाला) जन्म देणार असल्यानेवेदनांनी ओरडली.