Home Bibles योहान 11:32 · मराठी बायबल
योहान 11:32 · मराठी बायबल

मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”

Cross references

लूक 5:8

शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “प्रभु, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे!”

लूक 8:41

त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला. तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंति केली.

लूक 17:16

तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला. आणि त्याने त्याचे उपकार मानले. तो शोमरोनी होता.

योहान 4:49

राजाचा अधिकारी म्हणाला, “महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्व माझ्या घरी चला.

योहान 11:21

‘प्रभु’ मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता,

योहान 11:37

पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”

प्रकटीकरण 5:8

आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीसवडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्याहोत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या.

प्रकटीकरण 5:14

चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्याला अभिवादन केले.

प्रकटीकरण 22:8

ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणिपाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करु लागलो.

Interlinear

Choose Theme