Home Bibles योहान 10:5 · मराठी बायबल
योहान 10:5 · मराठी बायबल

अनोळखी माणसांच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत. ती त्या माणसापासून दूरपळून जातील. कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.

Cross references

1 राजे 22:7

पण यहोशाफाटने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”

नीतिसूत्रे 19:27

तुम्ही जर सुचना ऐकायला नकार दिलात तर तुम्ही मूर्खासारख्या चुका करत राहाल.

मार्क 4:24

नंतर तो त्यास म्हणाला, “तुम्ही जे ऐकता त्याचा काळजीपूर्वक विचार करा. जे माप तुम्ही इतरांसाठी वापरता त्याच मापाने तुमच्यासाठी मोजण्यात जेईल. किंबहूना थोडे जास्तच तुम्हांला देण्यात येईल.

लूक 8:18

म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या कारण ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असे वाटते तेदेखील काढून घेतले जाईल”.

इफिसकरांस 4:11

आणि त्याने स्वत:च काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसन्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली.

कलस्सैकरांस 2:6

म्हणून ज्याप्रमाणे तुम्हांला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभु म्हणून मिळाला, तसे त्याच्यामध्ये एक होत चला.

2 तीमथ्थाला 3:5

ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.

2 तीमथ्थाला 4:3

मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छी धरणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वत:च्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, त्यांची कानउघडणी कर.

1 पेत्र 2:1

म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा हेवा, निंदा यापासून सुटका करुन घ्या.

1 योहान 2:19

ते आमच्यातूनच बाहेरनिघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर तेआमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचानव्हता.

1 योहान 2:21

मीतुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही.

1 योहान 4:5

ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेतयासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.

प्रकटीकरण 2:2

तू काय करतोस ते मला माहीत आहे. तू खूप काम करतोस व धीर धरतोसहे मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की दुष्ट मनुष्यांचा तू स्वीकार करीत नाहीस आणि जे स्वत:ला प्रेषित समजतातपण जे तसे नाहीत त्यांची कसोटी तू घेतलेली आहेस आणि ते खोटे आहेत हे तुला समजले आहे.

Interlinear

Choose Theme