Home Bibles योहान 10:21 · मराठी बायबल
योहान 10:21 · मराठी बायबल

परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”

Cross references

निर्गम 4:11

मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला बहिरा, मुका, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मीच की नाही? मी ‘याव्हे’ आहे! होय ना?

निर्गम 8:19

तेव्हा जादुगारांनी फारोला सांगितले की हा चमत्कार देवाच्या सामर्थ्यानेच झाला आहे. परंतु फारोने मन कठीण केले व त्यांचे म्हणणे ऐकायचे नाकारले आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.

स्तोत्रसंहिता 94:9

देवानेच आपले कान केलेत तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो. देवानेच आपले डोळे केलेत. तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.

स्तोत्रसंहिता 146:8

परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो. संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो. परमेश्वराला चांगले लोक आवडतात.

नीतिसूत्रे 20:12

आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत.

यशया 35:5

मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बाहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल.

मत्तय 4:24

येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले.

मत्तय 11:5

आंधळे पाहू शकतात. पांगळे चालताल. कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.

योहान 9:6

असे बोलल्यानंतर, येशू मातीवर थुंकला. त्याने त्या थुंकीने चिखल केला, आणि त्या चिखलाचा गोळा करुन त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला.

योहान 9:32

जो मनुष्य जन्मजात आंधळा होता, त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Interlinear

Choose Theme