Home Bibles योहान 1:44 · मराठी बायबल
योहान 1:44 · मराठी बायबल

जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता.

Cross references

मत्तय 10:3

फिलीप्प व बर्थलमय, थोमा आणि जकातदार मत्तय, अल्फीचा मुलगा योकोब व तद्दय,

मत्तय 11:21

“हे खोराजिना, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता.

मार्क 3:18

अंद्रिया, फिलीप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी

मार्क 6:45

नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगतिले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले.

मार्क 8:22

ते बेथसैदा येथे आले आणि काही जणांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व येशूने त्याला स्पर्श करावा अशी विनंति केली.

लूक 6:14

शिमोनत्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले, आंद्रिया (पेत्राचा भाऊ), याकोब आणि योहान, फिलिप्प, बर्थलमय,

लूक 9:10

शिष्य परत आले तेव्हा त्यांनी येशूला आपण केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर येशू त्यांना घेऊन बेथसैदा नावाच्या नगरास गुप्तपणे गेला.

लूक 10:13

“खोराजिना तुझ्यासाठी हे वाईट होईल! बेथसैदातुझ्यासाठी हे वाईट होइल! कारण जे चमत्कार तुम्हांमध्ये घडले ते जर सोर व सिदोनमध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोणपाट नेसून राखेत बसून पश्चात्ताप केला असता.

योहान 12:21

ते फिलिप्पाकडे आले, जो गालीलातील बेथसैदा येथील होता, त्यांनी विनंति केली, “महाराज, येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे.”

योहान 14:8

फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 1:13

प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब (अल्फीचा पुत्र), शिमोन (झिलोटम्हणून माहित असलेला) आणि यहूदा (याकोबाचा पुत्र).

Interlinear

Choose Theme