Home Bibles योहान 1:16 · मराठी बायबल
योहान 1:16 · मराठी बायबल

शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले.

Cross references

जखऱ्या 4:7

तो उंच पर्वत जरुब्बाबेलला सपाट प्रदेश वाटेल. तो मंदिर उभारेल. मंदिराचा सर्वांत महत्वाचा दगड बसविल्यावर लोक “सुंदर! सुंदर!”‘ असा जल्लोश करतील.

मत्तय 3:11

तुम्ही तुमची अंत:करणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.

मत्तय 3:14

पण त्याला थोपवीत योहान म्हणाला, “खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे?”

मत्तय 13:12

कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल.

लूक 21:15

कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही.

योहान 3:34

देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो.

योहान 15:1

मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 3:12

जेव्हा पेत्राने हे पाहिले, तो लोकांना म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हांला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहात आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हांला असे वाटते का की, आमच्या चांगुलपणामुळे असे घडले?

रोमकरांस 5:2

आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धाप्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो.

रोमकरांस 5:17

एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले. पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे, ते अनुभवतात, ते विशेषेकरुन येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील.

रोमकरांस 5:20

पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली.

रोमकरांस 8:9

देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही.

1 करिंथकरांस 1:4

मी नेहमीच माझ्या देवाचे तुमच्यासाठी उपकार मानतो. कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुम्हांला मिळाली आहे,

इफिसकरांस 1:6

त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.

इफिसकरांस 1:23

मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे, ती पूर्णता तो मंडळीला देतो.

इफिसकरांस 2:5

आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.)

इफिसकरांस 3:19

आणि ख्रिस्ताची प्रीति जी ज्ञान्यांना मागे टाकते हे कळावे यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे.

इफिसकरांस 4:7

ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे.

कलस्सैकरांस 1:19

कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले.

कलस्सैकरांस 2:3

ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे.

कलस्सैकरांस 2:9

कारण देवाचे पूर्णत्व त्याच्यात शरीरात राहते.

1 पेत्र 1:2

देवपित्याने फार पूर्वीच केलेल्या योजनेप्रमाणे आत्म्याच्याद्वारे तुम्ही पवित्र व्हावे, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहावे आणि येशूचे रक्त तुमच्यावर शिंपडून तुम्हांला शुद्ध करावे, याकरीता तुम्हाला निवडले आहे. त्या तुम्हाला देवाची कृपा व शांति भरपूर प्रमाणात लाभो.

1 पेत्र 1:11

ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यामध्ये राहात होता. ते शोध घेत होते की कोणत्या वेळी व कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ताच्या दु:खाचा व गौरवाचा शोध घेण्यास आत्मा सुचवीत आहे.

Interlinear

Choose Theme