Home Bibles योएल 2:5 · मराठी बायबल
योएल 2:5 · मराठी बायबल

त्यांचा आवाज ऐका. तो आवाज, पर्वतावर चढणाऱ्या रथांच्या खडखडाटाप्रमाणे आहे. फोलकटे जाळणाऱ्या आगीप्रमाणे तो आवाज आहे. ते बलवान आहेत. ते युध्दासाठी सज्ज आहेत.

Cross references

निर्गम 5:12

म्हणून मग इस्राएल लोक गवत शोधण्याकरिता सर्व मिसर देशभर पांगले.

ईयोब 39:20

ईयोब, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? घोडा जोरात फुरफुरतोआणि लोक त्याला घाबरतात.

यशया 5:24

अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.

यशया 30:30

परमेश्वर आपला प्रचंड आवाज लोकांना ऐकायला भाग पाडील. परमेश्वराचा शक्तिशाली हात रागाने खाली पृथ्वीवर येताना पाहण्यास परमेश्वर लोकांना भाग पाडेल. सर्व जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे हा हात असेल. मुसळधार पाऊस व गारपीट करणाऱ्या वादळाप्रमाणे देवाचे सामर्थ्य असेल.

नहूम 2:3

त्या सैनिकांच्या ढाली लाल आहेत त्यांचा पोशाख लालभडक आहे लढण्यासाठी सज्ज होऊन उभे राहिलेले त्यांचे रथ अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे चमड्ढताना दिसत आहेत त्यांचे घोडे सरसावलेले आहेत.

नहूम 3:2

चाबकांच्या फटकाऱ्यांचे चाकांच्या खडखडाटाचे घोड्यांच्या टापांचे आणि रथांच्या घडघडाटाचे आवाज तुम्ही ऐक शकता.

मत्तय 3:12

तो धान्य निवडायला येईल. तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील. तो चांगले धान्य कोठारात साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील. तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील.”

प्रकटीकरण 9:9

त्यांची छाती लोखंडी उरस्त्राणासारखी (चिलखतासारखी) दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज युद्धात वेगानेधावणाऱ्या अनेक घोडयांच्या रथासारखा होता.

Interlinear

Choose Theme