परमेश्वर त्याच्या सैन्याला मोठ्याने हाक मारतो. त्याचा तळ फार मोठा आहे. सैन्य त्याच्या आज्ञा पाळते. ते सैन्य खूप बलशाली आहे. परमेश्वराचा खास दिवस हा विलक्षण आणि भयंकर आहे. तो कोण सहन करू शकेल?
Cross references
नंतर बलाम हे शब्द बोलला:“देव जेव्हा असे करतो तेव्हा कोणीही जिवंत रहात नाही.
परमेश्वर आकाशातून गरजला त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला
परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली.
जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.
तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
“त्यावेळी परमेश्वर ‘माशा’ व ‘मध माश्यांना’ बोलावील.
“डोंगरावर मोठा आवाज होत आहे तो लक्षपूर्वक ऐका. खूप माणसांच्या गोंगाटासारखा तो आवाज आहे कारण पुष्कळ राज्यातील माणसे एकत्र येत आहेत. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या सैन्याला एकत्र बोलावीत आहे.
परमेश्वर शूर सैनिकाप्रमाणे बाहेर जाईल लढण्यास सज्ज असलेल्या माणसाप्रमाणे तो असेल. तो खूप उत्तेजित होईल. तो आरोळी ठोकेल आणि मोठ्याने ओरडेल. तो त्याच्या शत्रूचा पराभव करील.
“यिर्मया, तू त्यांना पुढील संदेश दे: ‘परमेश्वर वरुन गर्जना करीत. आहे तो त्याच्या पवित्र मंदिरातून गर्जना करीत आहे. तो त्याच्या कुरणाला (लोकांना) ओरडतो. द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, त्याप्रमाणे देवाच्या आरोळ्या मोठ्या आहेत.
“याकोबाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा काळ आहे. हा अतिशय संकटाचा काळ आहे. पुन्हा असा काळ कधीच येणार नाही. पण याकोबाचे रक्षण होईल.
पण परमेश्वर त्या लोकांना परत आणेल. त्याचे नाव आहे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर देव’ तो समर्थपणे त्या लोकांचे रक्षण करील. त्यामुळे त्या देशाला विश्रांती मिळू शकेल. पण बाबेलच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही.”
शोक करा! का? कारण परमेश्वराचा खास दिवस जवळच आहे. त्या वेळी, सर्वशक्तिमान परमेश्वराची शिक्षा हल्ल्याप्रमाणे अचानक येईल.
“मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.पण, मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
सूर्याऐवजी अंधार होईल. चंद्राचे रूपांतर रक्तात होईल. मग परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवेल.
परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश व पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
आमोस म्हणाला: परमेश्वर सियोनच्या सिंहाप्रमाणे गर्जना करतो. त्याची प्रचंड गुरगुर यरुशलेमपासून ऐकू येते; मेंढपाळांची कुरणे सुकलीत. कर्मेल पर्वतसुध्दा सुकला आहे.
परमेश्वरचा खास न्यायाचा दिवस पाहण्याची तुमच्यापैकी कीहींची इच्छा आहे. तुम्हाला तो दिवस का बरे पहावयाचा आहे? परमेश्वराचा तो खास दिवस अंधार आणणार आहे, उजेड नाही.
परमेश्वराचा खास दिवस अंधारच आणील, उजेड नाहीतो निराशेचा दिवस असेल, प्रकाशाचा एक किरणही नसेल तो आनंदचा दिवस नसेल.
परमेश्वराच्या भयंकर क्रोधाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही त्याचा भयानक राग कोणीही सहन करू शकणार नाही त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे धगधगणारा असेल. तो येताच खडक हादरतील.
परमेश्वराने ठरविलेला न्यायदानाचा दिवस लवकरच येत आहे तो दिवस जवळच आहे, आणि वेगाने येत आहे. देवाच्या न्यायदानाच्या दिवशी. लोकांना मोठा आक्रांत ऐकू येईल. वीरसुध्दा रडतील.
“त्यावेळेची तयारी कोणीही करु शकत नाही. तो येताच, कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल.
कारण त्याच्या रागाचा मोठा दिवस आला आहे. त्यासमोर कोणीच टिकाव धरु शकत नाही!”
म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील. (त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती आगीत भस्महोऊन जाईल कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.”