Home Bibles ईयोब 9:11 · मराठी बायबल
ईयोब 9:11 · मराठी बायबल

देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही.

Cross references

ईयोब 23:8

“पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.

ईयोब 23:9

देव दक्षिणेत कार्यमग्र असला तरी मला तो दिसत नाही. देव जेव्हा उत्तरेकडे वळतो तेव्हाही तो मला दिसत नाही.

ईयोब 35:14

तेव्हा ईयोब, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही. तू देवाला भेटण्याची आणि त्याला तू निरपराध आहेस हे पटवून देण्याच्या संधीची वाट पहात आहेस असे म्हण.

स्तोत्रसंहिता 77:19

देवा, तू खोल पाण्यातून चाललास. तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.

1 तीमथ्याला 6:16

ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यार्पांत पोहोंचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो. ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो.

Interlinear

Choose Theme