Home Bibles ईयोब 41:3 · मराठी बायबल
ईयोब 41:3 · मराठी बायबल

ईयोब, लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का?

Cross references

निर्गम 19:5

म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल.

स्तोत्रसंहिता 24:1

पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.

स्तोत्रसंहिता 55:21

माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.

नीतिसूत्रे 15:1

शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो.

नीतिसूत्रे 18:23

गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो.

नीतिसूत्रे 25:15

धीराचे बोलणे माणसाच्याच काय पण राजाच्या विचारातही बदल करु शकते. हळूवार बोलणे फार परिणामकारक असते.

यशया 30:10

ते संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्ही काय करावे हे तुम्ही दिव्य दृष्टीने पाहू नका. आम्हाला सत्य सांगू नका. आम्हाला बऱ्यावाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांगा, आमच्यासाठी फक्त चागंल्याच गोष्टी तुमच्या दिव्य दृष्टीने बघा.

हाग्गय 2:8

त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.

Interlinear

Choose Theme