Cross references
पण देवा, मी जेव्हा स्वस्थ पडतो तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
“किंवा एखाद्याला देवाचा आवाज तेव्हा ऐकू येईल जेव्हा तो देवाने केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल. देव त्याला दु:ख देऊन ताकीद देत असतो. तो माणूस वेदनेने इतका तळमळत असतो की त्याची सगळी हाडे दुखतात.
परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द नाहीत.तरीसुध्दा राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”
दृष्टान्तातील माणस मला म्हणाला ‘दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो.
ही गोष्ट ऐकताच, मला कंप सुटला. मी मोठ्याने किंचाळलो मी अतिशय दुर्बल झाल्याचे मला जाणवले. मी जागच्या जागी नुसताच थरथर कापत उभा राहिलो. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची वाट पाहीन शत्रू आमच्यावर हल्ला करील.
जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली.
परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.
जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माइयावरठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे,