Home Bibles ईयोब 38:4 · मराठी बायबल
ईयोब 38:4 · मराठी बायबल

“ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.

Cross references

उत्पत्ति 1:1

देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.

ईयोब 15:7

“ईयोब, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?

ईयोब 28:25

देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली. सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.

स्तोत्रसंहिता 102:25

तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.

स्तोत्रसंहिता 102:26

जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.

स्तोत्रसंहिता 104:5

देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेनेउ भारलेस की तिचा कधीही नाश होणार नाही.

नीतिसूत्रे 3:19

परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले.

नीतिसूत्रे 8:22

खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने प्रथम माझीच निर्मिती केली.

नीतिसूत्रे 8:29

परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही. परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते.

नीतिसूत्रे 30:4

स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.?

इब्री लोकांस 1:2

पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले.

इब्री लोकांस 1:10

आणि देव असेही म्हणाला, “हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.

Interlinear

Choose Theme