Home Bibles ईयोब 38:23 · मराठी बायबल
ईयोब 38:23 · मराठी बायबल

मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करुन ठेवतो.

Cross references

निर्गम 9:18

म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरवर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.

निर्गम 9:24

गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरवर कधी आले नव्हते.

यहोशवा 10:11

इस्राएल सैन्य बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेकजण ठार झाले. इस्राएल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रूसैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले.

ईयोब 36:13

जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना शिक्षा केली तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.

ईयोब 36:31

देव त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.

यशया 30:30

परमेश्वर आपला प्रचंड आवाज लोकांना ऐकायला भाग पाडील. परमेश्वराचा शक्तिशाली हात रागाने खाली पृथ्वीवर येताना पाहण्यास परमेश्वर लोकांना भाग पाडेल. सर्व जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे हा हात असेल. मुसळधार पाऊस व गारपीट करणाऱ्या वादळाप्रमाणे देवाचे सामर्थ्य असेल.

यहेज्केल 13:11

मी त्यांच्यावर गारांचा वर्षांव करीन आणि मुसळधार पाऊस (शत्रू - सैन्य) पाडीन, असे तू त्यांना सांग. जोराचे वारे वाहतील आणि तुफान येईल. मग तटबंदी पडेल.

यहेज्केल 13:13

परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुमच्यावर रागावलो आहे म्हणून मी वादळ उत्पन्न करीन, मुसळधार पाऊस पाडीन, गारांचा वर्षाव करीन आणि तुमचा संपूर्ण नाश करीन.

मत्तय 7:27

मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

प्रकटीकरण 16:21

लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येकगारा 100 पौंडवजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण हीपीडा खरोखरच महाभयंकर होती.

Interlinear

Choose Theme