Home Bibles ईयोब 38:16 · मराठी बायबल
ईयोब 38:16 · मराठी बायबल

“ईयोब, सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?

Cross references

ईयोब 26:5

“मेलेल्या माणसाचा आत्मा भयाने पृथ्वीच्या खाली पाण्यात घाबरतो.

ईयोब 41:32

लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.

स्तोत्रसंहिता 77:19

देवा, तू खोल पाण्यातून चाललास. तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.

नीतिसूत्रे 8:24

महासागराच्या आधी माझा जन्म झाला. पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते.

यिर्मया 51:36

म्हणून परमेश्वर म्हणतो, “यहूदा, मी तुझे रक्षण करीन. बाबेलला शिक्षा होईल ह्याची मी दक्षता घेईन. मी बाबेलचा समुद्र आटवीन आणि तिचे जलस्रोत सुकवून टाकीन.

Interlinear

Choose Theme