Home Bibles ईयोब 36:23 · मराठी बायबल
ईयोब 36:23 · मराठी बायबल

काय करावे ते देवाला कुणी सांगू शकत नाही ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कुणी त्याला म्हणू शकत नाही.

Cross references

ईयोब 8:3

देव नेहमीच न्यायी असतो. तो सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या गोष्टी कधीच बदलत नाही.

ईयोब 21:22

“देवाला कुणीही ज्ञान शिकवू शकत नाही. देव मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.

ईयोब 34:10

“तुम्हाला समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. जे वाईट आहे ते देव कधीही करणार नाही. तो सर्वशक्तिमान देव कधीच चुकणार नाही.

ईयोब 34:12

हे सत्य आहे देव कधीही चुकत नाही, सर्वशक्तिमान देव नेहमीच न्याची असतो.

ईयोब 34:13

देवाला कुणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. सगळ्या जगाची काळजी देवावर कुणी सोपवली नाही. सारे काही देवानेच निर्माण केले आहे आणि सारे त्याच्याच नियंत्रणाखाली आहे.

ईयोब 40:8

“ईयोब, मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करुन तू स्वत:चे निरपराधित्व सिध्द करु पहात आहेस.

यशया 40:13

काय करावे हे कोणीही माणसाने परमेश्वराला सांगितले नाही. त्याने ज्या गोष्टी केल्या, त्या कशा कराव्या हे ही परमेश्वराला कोणी माणसाने सांगितले नाही.

यशया 40:14

परमेश्वराने कोणा माणसाची मदत मागितली का? कोणा माणसाने परमेश्वराला प्रामाणिकपणा शिकविला का? परमेश्वराला कोणा माणसाने ज्ञान दिले का? कोणी परमेश्वराला शहाणपण शिकविले का? नाही. या गोष्टी परमेश्वराला अगोदरच माहीत होत्या.

रोमकरांस 2:5

पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वत:च तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील.

रोमकरांस 3:5

जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो).

रोमकरांस 9:14

तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय नाही. आहे काय? खात्रीने नाही.

रोमकरांस 11:34

पवित्र शास्त्र सांगते.“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” यशया 40:13

1 करिंथकरांस 2:16

“प्रभूचे मन कोण जाणतो, जो त्याला शिकवू शकेल?” यशया 40:13परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे.

इफिसकरांस 1:11

ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो

Interlinear

Choose Theme