“किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही. का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत. असे त्यांना अजूनही वाटते.
Cross references
माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही.
म्हणून ते आतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत. ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरुन हे कळून येते.
त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
“या सर्व गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही माझी मदत मागाल. पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मला शोधाल पण मी तुम्हाला सापडणार नाही.
मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन. मी परात्पर देवासारखा होईन.”
देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल.