‘ईयोबला अजून शिक्षा करायला हवी असे मला वाटते. का? कारण ईयोब एखाद्या वाईट माणसासारखे आपल्याला उत्तर देत आहे.
Cross references
परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. जे लोक देवाला क्रोध आणतात ते शांततेने राहातात. केवळ त्यांची स्वत:ची शक्तीच त्यांचा देव असतो.
दुष्ट माणसांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
“ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस.
देव माझे हृदय कमजोर बनवतो आणि मी माझे धैर्य गमावून बसतो. सर्वशक्तिमान देव मला घाबरवतो.
“त्या सर्वशक्तिमान देवाला माणसाच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी कशा माहीत असतात? परंतु त्याच्या भक्तांना मात्र त्याच्याबद्दल काहीच माहीत नसते.”
ईयोब वाईटांशी मैत्री करतो त्याला दुष्टांबरोबर राहायला आवडते.
तू माझ्या ह्दयात खोलवर पाहिलेस. तू रात्रभर माझ्या बरोबर होतास तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही. मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या ह्दयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.