एखादा माणूस जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करील. देव लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
Cross references
आपल्या करणीचे फळ परमेश्वर आपल्याला देतो. आपल्या योग्य वागण्याचे बक्षीस मिळते, तसंच चुकीचीही शिक्षा भोगावी लागाते. तुझा पराभव करायची संधी आज मला परमेश्वराने दिली होती. पण परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला मी इजा पोचू दिली नाही.
तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल. तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
प्रभु, तुझे प्रेम खरे आहे. माणूस ज्या गोष्टी करतो त्या नुसार तू त्याला बक्षिस देतोस वा शिक्षा करतोस.
म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात.
“माझा त्याच्याशी काही संबंध नाही” असे तुम्ही म्हणू शकत नाही. परमेश्वराला सर्व माहीत असते. आणि तुम्ही काही गोष्टी का करता ते त्याला माहीत असते. परमेश्वर तुमच्यावर लक्ष ठेवतो. त्याला सर्व कळते. आणि तुम्ही ज्या गोष्टी करता त्याबद्दल परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल.
पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.
परमेश्वर, फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो. लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस. तू सत्कृत्ये करणाऱ्यांना बक्षिस देतोस व दुष्कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतोस. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस.
एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा, त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल. असा दुष्ट मुलगा जगणार नाही. त्याने भयंकर गोष्टी केल्याबद्दल, त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत : जबाबदार असेल.
“पण तुझी माणसे म्हणतात, ‘हे योग्य नाही, परमेश्वर, माझा प्रभू, असा असूच शकत नाही.’“पण ते लोक प्रामाणिक नाहीत. त्यांनी बदललेच पाहिजे.
कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.
कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे
तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल.
आणि ज्याप्रमाणे, देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा नि:पक्षपातीपणे, प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना, या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भितीमध्ये आपले जीवन जगा.
“पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळदेईन.