Home Bibles ईयोब 31:7 · मराठी बायबल
ईयोब 31:7 · मराठी बायबल

मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील.

Cross references

गणना 15:39

तुम्ही या गोंड्याकडे बघून परमेश्वराने दिलेल्या सगव्व्या आज्ञा लक्षात ठेवू शकाल. म्हणजे तुम्ही आज्ञा पाळाल. तुम्ही आज्ञा विसरुन काहीही चूक करणार नाही आणि तुमच्या शरीराला व डोव्व्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणार नाही.

ईयोब 9:30

मी माझे अंग बफर्ाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.

ईयोब 16:17

मी कुणाशीही दुष्टपणाने वागलो नाही. तरीही माझ्या बाबतीत या वाईट गोष्टी घडल्या. माझ्या प्रार्थना नेहमी बरोबर आणि शुध्द असतात.

ईयोब 17:9

पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहातात. निष्पाप लोक अधिक सामर्थ्यवान होतात.

ईयोब 23:11

मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.

ईयोब 27:5

तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.

ईयोब 27:6

मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही.

स्तोत्रसंहिता 7:4

मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.

स्तोत्रसंहिता 44:20

आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का? आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.

स्तोत्रसंहिता 101:3

मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.

उपदेशक 11:9

तेव्हा तरुणांनो! जो पर्यंत तरुण आहात तो पर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या, आनंदी व्हा. मनाला जे करावेसे वाटते ते करा. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते करा. पण तुम्ही जे जे कराल त्यावरून देव तुमचा न्याय करील हे लक्षात ठेवा.

यशया 33:15

हो! पैशासाठी दुसऱ्यांना जे त्रास देत नाहीत असे प्रामाणिक लोक या अग्नीमधूनही वाचतील. ते लोक लाच घेत नाहीत. दुसऱ्याची हत्या करण्याच्या बेताला ते नकार देतात. दुष्कृत्यांच्या योजनांकडे ते पाहण्याचे टाळतात.

यहेज्केल 6:9

मग ह्या वाचलेल्यालोकांना कैदी म्हणून नेले जाईल. त्यांना सक्तीने दुसऱ्या देशांत राहावे लागेल. पण ते लोक माझे स्मरण ठेवतील. मी त्यांचे ह्दयपरिवर्तन केले. म्हणून त्यांनी केलेल्या दुष्कृत्याबद्दल ते स्वत:चीच घृणा करतील. भूतकाळात, त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, माझा त्याग गेला. आपल्या नवऱ्यला सोडून दुसऱ्‌या पुरुषांच्या मागे लागणाऱ्या बाईप्रमाणे, ते त्या गलिच्छ मूर्तींच्या मागे लागले. त्यांनी भयंकर कृत्ये केली.

यहेज्केल 14:3

“मानवपुत्रा, हे लोक तुझ्याशी बोलायला आले आहेत. मला तू त्यांचा हिताच्या गोष्टी विचाराव्यास अशी त्यांची इच्छा आहे. पण अजूनही त्यांच्याजवळ त्या अमंगळ मूर्ती आहेत. त्यांना पाप करायला लावणाऱ्या ह्या गोष्टी त्यांनी जवळ बाळगल्या आहेत. ते अजूनही त्यांची पूजा करतात. मग ते सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे कशाला येतात? मी त्यांच्या प्रश्र्नंना उत्तर द्यावे का? नाही!

यहेज्केल 14:7

एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल.

मत्तय 5:29

जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे, संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा.

Interlinear

Choose Theme