“माझे गुलाम माझ्या विरुध्द तक्रार करतात तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
Cross references
“काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मेली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी;
“जर एखाद्याने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या डोव्व्यावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा डोळा गेला तर त्या मालकाने त्याला मुक्त करून जाऊ द्यावे कारण त्याने आपला डोळा देऊन खंडणी भरली आहे. गुलाम किंवा गुलामस्त्रीला हा नियम सारखाच लागू आहे.
तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर.
तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांना तुम्ही कायमचे गुलाम करुन घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेंकावर कठोरपणाने चालवू नये.
“एखादी इब्री बाई किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्याला मुक्त करा.
“तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो.
मी तुमच्या पूर्वजांना म्हणालो: ‘प्रत्येक सात वर्षाच्या अखेरीला प्रत्येकाने आपल्याकडील इब्री गुलामांना मुक्त केलेच पाहिजे. तुमच्या एखाद्या इब्री बांधवाने स्वत:ला तुम्हाला विकले असेल, तर त्याने सहा वर्षे तुमची गुलामी केल्यावर तुम्ही त्याला जाऊ दिलेच पाहिजे.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही वा माझ्याकडे लक्ष दिले नाही.
आणि मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकाविण्याचे सोडून द्या. लक्षात ठेवा की तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे. आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय्य व योग्य ते द्या.