Home Bibles ☰ Books ईयोब 28:23 · मराठी बायबल
ईयोब 28:23 · मराठी बायबल

“फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे. फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे.

Cross references

स्तोत्रसंहिता 19:7

परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे. ती देवाच्या लोकांना शक्ती देते. परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे. त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.

स्तोत्रसंहिता 147:5

आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.

नीतिसूत्रे 2:6

परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते.

नीतिसूत्रे 8:14

परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते. मी समजूतदारपणा आणि शक्ती देते.

नीतिसूत्रे 8:22

खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने प्रथम माझीच निर्मिती केली.

उपदेशक 7:24

गोष्टी अशा का आहेत ते मला खरोखरच कळत नाही. हे कोणालाही कळणे फार कठीण आहे.

मत्तय 11:27

माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.

लूक 10:21

त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वार्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभु मी तुझी स्तुति करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.

प्रेषितांचीं कृत्यें 15:18

या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत’

रोमकरांस 11:33

देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची सपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे.

1 करिंथकरांस 1:30

कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा झाला.

यहूदा 1:25

एकच देव आहे, त्याला आपलाप्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंतकाळ असो. आमेन.

Interlinear

Choose Theme