तुम्ही ओफिरच्या सोन्याने किंवा मौल्यवान शोहमच्या खड्याने वा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
Cross references
आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.
110 टन ओफीरचे शुध्द सोने, 260 टन निर्भेळ चांदी मी दिली. मंदिराच्या भिंती या चांदीने मढवायच्या आहेत.
राजांच्या मुली करवल्या आहेत. तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.
दुर्मिळ सोन्याप्रमाणे चांगले लोकही थोडेच राहतील आणि शुध्द सोन्याहून त्यांची किंमत जास्त असेल.
तू एदेनमध्ये राहात होतास. एदेन हा देवाचा बाग आहे. तुझ्याजवळ माणके, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी, नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती, आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती. ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले. देवाने तुला सामर्थ्यशाली केले.