Home Bibles ईयोब 27:10 · मराठी बायबल
ईयोब 27:10 · मराठी बायबल

त्याने सर्वशक्तिमान देवाशी बोलून आनंद मिळवायला हवा होता. त्याने नेहमी देवाची प्रार्थना करायला हवी होती.

Cross references

ईयोब 22:26

नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील. तू त्याच्याकडे बघू शकशील.

स्तोत्रसंहिता 14:4

दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायलाखूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.

स्तोत्रसंहिता 37:4

परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.

स्तोत्रसंहिता 43:4

मी देवाच्या वेदीजवळ जाईन मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन. देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.

स्तोत्रसंहिता 78:34

देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले. ते देवाकडे धावत परतले.

हबक्कूक 3:18

तरी मी परमेश्वराठयी आनंद करीन. माझ्या तारणहाराजवळ, देवाजवळ मला सुख मिळेल.

मत्तय 13:21

तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.

लूक 18:1

त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली.

प्रेषितांचीं कृत्यें 10:2

कर्नेल्य हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.

इफिसकरांस 6:18

प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.

1 थेस्सलनीकाकरांस 5:17

नेहमी प्रार्यना करीत राहा.

Interlinear

Choose Theme