Home Bibles ☰ Books ईयोब 25:5 · मराठी बायबल
ईयोब 25:5 · मराठी बायबल

देवाला चंद्र सुध्दा तेजोमय आणि पवित्र वाटत नाही. देवाच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.

Cross references

ईयोब 4:18

हे बघा, देव त्याच्या स्वर्गातील दूतांवर देखील विश्वास टाकू शकत नाही. त्याला स्वत:च्या दूतांमध्ये सुध्दा काही दोष आढळतात.

ईयोब 9:2

“तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल?

ईयोब 14:1

ईयोब म्हणाला: “आपण सर्व मनुष्यप्राणी आहोत. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.

ईयोब 15:15

देव त्याच्या पवित्र दूतांवर विश्र्वास ठेवत नाही. देवाशी तुलना करता स्वर्गसुध्दा निर्मळ नाही.

ईयोब 31:26

मी चकाकत्या सूर्यांची सुंदर चंद्राची कधीच पूजा केली नाही.

यशया 24:23

यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल. त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल. त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल आणि सूर्याला लाज वाटेल.

यशया 60:19

“या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल.

2 करिंथकरांस 3:10

त्यात गौरव होते, पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते, तेव्हा ते कमी होते.

Interlinear

Choose Theme