Home Bibles ईयोब 24:15 · मराठी बायबल
ईयोब 24:15 · मराठी बायबल

ज्या माणसाला व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. ‘मला कुणीही बघणार नाही’ असे त्याला वाटते.’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.

Cross references

उत्पत्ति 38:14

तामार नेहमीच आपल्या विधवादशेतील वस्त्रे घालीत असे; तेव्हा तिने आता वेगळी वस्त्रे घातली आणि बुरखा घेऊन आपले तोंड झाकले. नंतर तिम्ना जवळच्या एनाईम गांवाला जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ ती बसून राहिली. यहूदाचा मुलगा शेला आता लग्न करण्याच्या वयाचा झाला आहे हे तामारला माहीत होते; परंतु त्याच्याशी तिचे लग्न लावून देण्याविषयी यहूदा काहीच योजना करीत नव्हता.

निर्गम 20:14

“व्यभिचार करु नकोस.

2 शमुवेल 11:4

तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला. नंतर स्नान करुन शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.

2 शमुवेल 12:12

बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलां देखत होईल.”’

ईयोब 22:13

पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?

स्तोत्रसंहिता 10:11

“देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला. आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही” असा विचार गरीब लोक करतात.

स्तोत्रसंहिता 50:18

तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.

स्तोत्रसंहिता 73:11

ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही, सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.”

स्तोत्रसंहिता 94:7

आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही. ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इस्राएलाच्या देवाला माहीत नाही.

नीतिसूत्रे 6:32

पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.

नीतिसूत्रे 7:7

बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता.

नीतिसूत्रे 7:9

तेव्हा अंधार होत होता - सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती.

यहेज्केल 8:12

देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलधारे अंधारात काय करीत आहेत. हे तुला दिसतेच ना? प्रत्येक माणसाला त्याच्या खोट्या देवासाठी वेगळी खोली आहे. ते लोक मनाशी म्हणतात ‘परमेश्वर आम्हाला पाहू शकत नाही. परमेश्वराने ह्या देशाचा त्याग केला.”‘

यहेज्केल 9:9

देव म्हणाला, “इस्राएल आणि यहुदाच्या लोकांनी अनंत पापे केली आहेत, ह्या देशात सगळीकडे खून होत आहेत. ही नगरी अपरांधानी भरुन गेली आहे. का? कारण लोक मनाशीच म्हणतात, ‘देवाने ह्या देशाचा त्याग केला. आम्ही काय करीत आहोत, हे त्याला दिसू शकत नाही.’

Interlinear

Choose Theme