Home Bibles ईयोब 21:16 · मराठी बायबल
ईयोब 21:16 · मराठी बायबल

“दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वत:चा काही वाटा नसतो हे खरे आहे. मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.

Cross references

उत्पत्ति 49:6

त्यांनी गुपचूप वाईट गोष्टी करण्याचे ठरवले; त्यांचे हे बेत माझ्या जीवाला मान्य नाहीत; तसेच त्यांच्या गुप्त बैठका मला मान्य नाहीत; त्यांनी रागाच्या भरात माणसांची कत्तल केली; गंमत म्हणून त्यांनी पशूंना जखमी केले;

ईयोब 1:21

तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”

ईयोब 12:9

या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत हे सर्वांना ठाऊक आहे.

ईयोब 22:18

आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही.

स्तोत्रसंहिता 1:1

1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावरविश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.

स्तोत्रसंहिता 49:6

काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत.

स्तोत्रसंहिता 52:5

म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल. तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.

नीतिसूत्रे 1:10

मुला, ज्या लोकांना पाप आवडते ते लोक तुला प्रलोभने दाखवतील. तू त्यांचे ऐकू नकोस.

नीतिसूत्रे 5:8

जी स्त्री व्यभिचार करते तिच्यापासून दूर राहा. तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नका.

उपदेशक 8:8

आपल्या आत्म्याला सोडून जाण्यापासून परावृत्त करण्याची शक्ती कोणाकडेही नसते. स्वत:चे मरण थांबवणे हे कोणाच्याही हाती नसते. युध्दात वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याप्रमाणे जर एखाद्याने दुष्कृत्य केले तर ते कृत्य त्याची पाठ सोडणार नाही.

लूक 16:2

म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्यायाला आत बोलावले आणि म्हणाला, “हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही.’

लूक 16:25

परंतु अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस.

Interlinear

Choose Theme