Home Bibles ईयोब 16:9 · मराठी बायबल
ईयोब 16:9 · मराठी बायबल

“देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.

Cross references

ईयोब 6:4

त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते. देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.

ईयोब 10:16

मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा शिकाऱ्याने सिंहाची शिकार करावी तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.

ईयोब 13:24

देवा, तू मला का चुकवीत आहेस? आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस?

ईयोब 13:27

तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.

ईयोब 18:4

ईयोब तुझा राग तुलाच अधिक त्रासदायक होत आहे. केवळ तुझ्यासाठी लोकांनी हे जग सोडून जावे का? देव केवळ तुझ्या समाधानसाठी डोंगर हलवेल असे तुला वाटते का?

ईयोब 19:11

त्याचा क्रोध मला जाळीत आहे. तो मला त्याचा शत्रू म्हणतो.

स्तोत्रसंहिता 35:16

त्यांनी वाईट भाषा वापरली आणि माझी चेष्टा केली. त्यांनी माइयावरचा त्यांचा राग कराकरा दातखाऊन व्यक्त केला.

स्तोत्रसंहिता 37:12

दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.

स्तोत्रसंहिता 50:22

तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.

विलापगीत 2:16

तुझे सर्व शत्रू तुला हसतात. ते तुझ्याकडे पाहून फूत्कार टाकतात आणि दातओठ खातात ते म्हणतात, “आम्ही त्यांना गिळले आहे. आम्ही खरोखरच ह्या दिवसाची वाट पाहात होतो. अखेर तो उजाडला.”

विलापगीत 3:10

परमेश्वर, माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या, अस्वलासारखा आहे. लपून बसलेल्या सिंहासारखा तो आहे.

होशेय 5:14

का? एफ्राईमच्या दृष्टीने मी सिंहाप्रमाणे होणार आहे. यहूदा राष्ट्राला मी तरुण सिंहासारखा होणार आहे. मी, हो मी, त्यांचे फाडून तुकडे तुकडे करीन. मी त्यांचे हरण करीन. आणि कोणीही त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही.

होशेय 6:1

“चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.

मीखा 7:8

मी पडलो आहे. पण शत्रूंनो, मला हसू नका. मी पुन्हा उठेन आता मी अंधारात बसतोय पण परमेश्वरच माझा प्रकाश होईल.

प्रेषितांचीं कृत्यें 7:54

यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले.

Interlinear

Choose Theme