तुम्ही ही अशी पापे केलीत तर तुम्ही माझ्या नावाच्या या घरात माझ्यासमोर उभे राहू शकाल असे तुम्हाला वाटते का? अशा भयंकर गोष्टी करुन तुम्ही माझ्यासमोर उभे राहून म्हणू शकाल का “आम्ही सुरक्षित आहोत?”
Cross references
परमेश्वर त्याला म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थान माझ्या ध्यानीमनी राहील.
परमेश्वराच्या मंदिरात त्याने इतर देवतांच्या पूजेसाठी वेद्याग बांधल्या. (आपल्या नावाप्रीत्यर्थ परमेश्वराने हे मंदिर केले होते.)
परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या भलत्यासलत्या देवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरुशलेममध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते.
मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली. या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, “या मंदिरात आणि यरुशलेममध्ये माझे नाव चिरंतन काल राहील. इस्राएलच्या सर्व कुळांमधून मी यरुशलेमला निवडले.
“आज मी (शांत्यर्पणाची) मेजवानी दिली. मी जे द्यायचे वचन दिले होते ते सर्व मी दिले आणि अजूनही माझ्याकडे खूप अन्न उरले आहे.
दुष्ट माणसे ज्या गोष्टी अर्पण करतात त्या परमेश्वराला आवडत नाहीत. पण परमेश्वर चांगल्या माणसाची प्रार्थना ऐकून आनंदी होतो.
सदोमच्या नेत्यांनो, परमेश्वराचा संदेश ऐका गमोराच्या लोकांनो, देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या.
हो ते पवित्र नगराचे नागरिक आहेत. ते इस्राएलच्या देवावर अवलंबून राहतात. सर्वशक्तिमान परमेश्वर अशी त्याची ख्याती आहे.
म्हणजे माझी उपासना करायला ते रोज येतील. माझे मार्ग जाणून घ्यायची लोकांना इच्छा होईल. योग्यरीतीने जगणारे ते राष्ट्र होईल. देवाच्या चांगल्या आज्ञांचे पालन करण्याचे ते सोडणार नाहीत. त्यांना योग्य न्याय देण्यास ते मला सांगतील. न्याय निर्णयासाठी त्यांना देवाकडे जावेसे वाटेल.
हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.”‘ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन.
हे असे कर कारण यहूदाच्या लोकांना पापे करताना मी पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी त्यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. मी त्या मूर्तीचा तिरस्कार करतो. माझ्या नावाच्या मंदिरात त्यांनी त्या मूर्ती स्थापिल्या आहेत. त्यांनी माझे घर ‘अपवित्र’ केले आहे.
त्या लोकांनी त्यांच्या मूर्ती तयार केल्या, मला त्या मूर्तीची चीड येते. त्यानी त्या मूर्ती माझ्या नावावर असलेल्या मंदिरात ठेवल्या. त्यामुळे माझे मंदिर ‘अपवित्र झाले.
काही वेळा पूर्वी, योग्य ते करण्यापासून तुम्हीही विचलित झालात. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्याकडे गुलाम असलेल्या इब्री बांधवाला स्वातंत्र्य दिले आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात, माझ्यापुढे एक करारही केलात.
परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “यरुशलेम, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो की मी तुला शिक्षा करीन. मी तुला शिक्षा करीन असे वचन देतो. का? कारण माझ्या पवित्र स्थानावर तुम्ही भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे ते स्थान अपवित्र झाले. मी तुम्हाला शिक्षा करीन. अजिबात दया दाखविणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही.
इस्राएल लोकांनो, परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या, कोणाला “त्या अमंगळ मूर्तीची पूजा करावीशी वाटत असेल, तर खुशाल करु दे. पण नंतर माझ्या सल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही त्या गलिच्छ मूर्तीना बलिदान देऊन ह्यापुढे अजिबात माझ्या नावाला बट्टा लावू शकणार नाही.”
ते तुझा किती तिरस्कार करतात हे ते तुला दाखवून देतील. तू मिळविलेली प्रत्येक गोष्ट ते काढून घेतील. ते तुला उघडी नागडी करतील. लोकांना तुझी पापे स्पष्ट दिसतील. तू वेश्येप्रमाणे वागलीस आणि दुष्ट स्वप्ने पाहिलीस हे त्यांना कळेल.
त्यांनी व्याभिचाराचे पाप केले आहे. खुनाचा अपराध त्यांनी केला आहे. त्या वेश्येप्रमाणे राहिल्या. त्या अमंगळ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला. त्यांना माझ्यापासून झालेल्या मुलांना त्यांनी बळजबरीने आगीतून जायला लावले. त्यांच्या घाणेरड्या मूर्तींना अन्न देण्यासाठी त्यांनी हे सर्व केले.
त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.
म्हणून ते माझे लोक असल्यासारखे तुझ्याकडे येतात. ते माझे लोक असल्याप्रमाणे ते करणार नाहीत. ते त्यांना भावते तेच करु इच्छितात. ते लोकांना फसवून खूप पैसा मिळवू बघतात.
अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वत: तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
“मी तुम्हां सर्वाविषयी बोलत नाही. ज्यांना मी निवडले ते मला माहीत आहेत.” परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे: ‘जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचलली आहे.’
येशूने उत्तर दिले, “ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडवून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला.
नंतर यहूदी येशूला कयफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत.